कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात भुसावळात भाजपचे निषेध आंदोलन

BJP protest movement in Bhusawal against contract recruitment decision
भुसावळ : तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी पध्दतीची भरती करण्याचा निर्णय त्यांच्या काळात घेतला होता. भरती प्रक्रिया राबवण्याचे कंत्राट नऊ खाजगी कंपन्यांना देण्यात आले व या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत भुसावळात भाजपा पदाधिकार्यांनी आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केले.
महाविकास आघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजी
दरम्यान शिंदे आणि फडणवीस सरकारने नुकताच हा निर्णय रद्द केला असून या अनुषंगाने कंत्राटी पध्दतीने भरती करण्याच्या निर्णय घेणार्या महाविकास आघाडीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध आंदोलन करून निषेध केला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेधाचे बॅनर हातात घेऊन तत्कालीन महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यांचा निषेध आंदोलनात सहभाग
भारतीय जनता पार्टी प्रदेश चिटणीस अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, विधानसभा निवडणूक प्रभारी संजय पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, सुनील महाजन, माजी नगसेवक प्रमोद नेमाडे, गिरीश महाजन, अजय नागराणी, दिनेश नेमाडे, अॅड.बोधराज चौधरी, पुरुषोत्तम नारखेडे, मनोज बियाणी, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रवीण इखनकर, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, दिलीप कोळी, अनिरुद्ध कुळकर्णी, अलका शेळके, शैलेजा पाटील, अनिता आंबेकर, मनीषा पाटील, वंदना सोनार, राजु खरारे, पुंडलिक पाटील, लक्ष्मण सोयंके, कैलास शेलोडे, संजय भिरुड, प्रमोद पाटील, जयंतीलाल सुराणा, समाधान अप्पा, अर्जुन खरारे, बिसन गोहर, राजेश पाटील, गिरीश पाटील, राहुल तायडे, शिशिर जावळे, रवींद्र ढगे, शंकर शेळके, अनिल पाटील, गोपी राजपूत, विलास अवचार, दीपक तायडे, सरजू तायडे, प्रशांत देवकर, भावेश चौधरी, गोकुळ बाविस्कर, चेतन सावकारे, रेहमान मेंबर, सज्जाद शेख, अथर्व पांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


