जळगाव कारागृहातील तिघा कर्मचार्‍यांचा कसुरी अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे


भुसावळ- पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या दरोड्यातील आरोपी बाबा काल्याच्या शोध अद्यापही लागू शकला नसतानाच बंदोबस्तात कसुरी केल्याने जळगाव कारागृहाच्या तिघाही कर्मचार्‍यांविषयीचा अहवाल शहर पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला आहे. लवकरच या कर्मचार्‍यांचे निलंबन होण्याची दाट शक्यता असून बाबा काल्या पसार झाल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौचालयाची खिडकी तोडून काढला पळ
जबरी चोरी, रस्ता लुटीसह शरीराविरुद्ध हल्ला केल्याचे तब्बल सहा गुन्हे दाखल असलेल्या बाबा काल्याने 5 जुलै रोजी रजा चौक परीसरात अरबाज शकील आझाद (22) यास लुटले होते तर खिशातील रक्कम काढताना विरोध झाल्याने आरोपीने अरबाजवर चाकू हल्ला करून पळ काढला होता त्यानंतर गोपनीय माहितीवरून आरोपीस 17 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची जळगावच्या कारागृहात रवानगी करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयीन कामानिमित्त आरोपी बाबा काल्यासहकलीम शेख या दोघांना घेवून जळगाव कारागृहातील प्रवीण पाटील, विकास पाटील व प्रवीण जाधव हे कर्मचारी घेवून आले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास आरोपीने शौचास जाण्याचा बहाणा करीत शौचालयाच्या खिडकीच्या काच काढून पोबारा केला होता. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.


कॉपी करू नका.