दोन हजारांची लाच भोवली : जवखेडा मंडळाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात


Bribe of 2000 : Jawkheda District Magistrate Dhule in ACB’s net धुळे : सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील मंडळाधिकार्‍याला धुळे एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. मुकेश श्रीकांत भावसार (42, उत्सव मॉल मागे, शिरपूर) असे अटकेतील मंडळाधिकार्‍याचे नाव आहे.

लाच स्वीकारताच अटक
40 वर्षीय तक्रारदारा यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर तक्रारदार व त्यांच्या बहिणीचे नाव लावून दिल्याच्या मोबदल्यात मंडळाधिकारी भावसार यांनी बुधवारी दोन हजारांची लाच मागितली होती व तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. पंचासमक्ष लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक इहेमंत बेंडाळे, हवालदार राजन कदम, संतोष पावरा, चालक हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !