शिरपूर तालुक्यात तीन कोटींचा गांजा जप्त

धुळे गुन्हे शाखेची सर्वात मोठी कारवाई : संशयित पसार : पथकाला 20 हजारांचे बक्षीस


Cannabis worth three crore seized in Shirpur taluka धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजावर सर्वात मोठी कारवाई करीत तब्बल तीन कोटी रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात शुक्रवार, 3 रोजी दुपारी करण्यात आली. पोलिसांनी कापूस व तुरीआड फुलवलेला तीन कोटी 10 हजार रुपये किंमतीचा सहा हजार किलो वजनाचा गांजा जप्त केला. या गांजाचे मुंबई-मध्य प्रदेशपर्यंत कनेक्शन असल्याचा संशय आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
लाकड्या हनुमान शिवारात देवा कहारू पावरा याने मोठ्या प्रमाणात गांजा लावल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने शुक्रवारी छापाटाकला. या कारवाईनंतर देवा पावरा हा पसार झाला. या कारवाईत तब्बल सहा हजार 2 किलो गांजा मिळून आला. पाच हजार रुपये किलोप्रमाणे त्याची किंमत 3 कोटी 10 हजार एवढी आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल महेंद्र देवराम सपकाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पथकाला 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे, बाळासाहेब सूर्यवंशी, सुनील वसावे, शिरपूर तालुक्याचे पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, मयूर पाटील, योगेश जगताप, किशोर पाटील, जगदीश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, चालक राजू गीते, राजू ढिसले, स्वप्नील बांगरे, प्रकाश अहिरे आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !