जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास पाटील यांचे निधन


Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil’s younger brother Kailas Patil passed away धरणगाव : जळगावचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे बुधवार, 8 नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी 1.15 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अकस्मात निधन झाले. बुधवार, 1.30 वाजता पाळधी येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

कैलास पाटील यांच्या अकाली मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर वज्राघात झाला असून परीसरातून शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी पाळधी येथे मोठ्या संख्येने धाव घेतली.

 


कॉपी करू नका.