पाय निसटला अन् मृत्यूने गाठले : जळगावातील कृषी पर्यवेक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

Lost foot and met with death: The unfortunate death of an agricultural supervisor in Jalgaon जळगाव : जळगावातील कृषी पर्यवेक्षकाचा तिसर्या मजल्यावरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परीसरात गुरुवारी सकाळी 8.30 वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उल्हासराव चंद्रराव पाटील (52, नित्यानंद सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
परीवारावर शोककळा
उल्हासराव चंद्रराव पाटील हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह मोहाडी रोडवरील नित्यानंतर सोसायटीच्या तिसर्या मजल्यावर वस्तव्याला होते. ते ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होते. सध्या दिवाळी असल्याने गुरूवार, 9 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये साफसफाईचे काम करीत होते व या दरम्यान त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते तिसर्या मजल्यावरून खाली पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
नातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोश
बेशुद्धावस्थेत पाटील यांना यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा, मुलगा हितेश आणि मुलगी हर्षदा असा परिवार आहे. हर्षदा ही बीडीएसचे शिक्षण घेतले आहे तर हितेश हा बीएएमएसचे शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


