भरधाव ट्रॅक्टर दुचाकीवर आदळून दुचाकीस्वार ठार : शिरपूर तालुक्यातील घटना


Cyclist killed after speeding tractor collides with two-wheeler : incident in Shirpur taluka शिरपूर :शिरपूर तालुक्यातील वाठोडा शिवारात जैतपूर फाट्याजवळ थाळनेरकडून शिरपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. भरधाव ट्रॅक्टर (एम.एच.18 बी.एक्स. 4764) ने समोरून येणारी दुचाकी (एम.एच. 18 ए.आर. 8966) ला धडक दिल्याने दुचाकीस्वार सुकलाल धनगर (निळे, 34, रा.थाळनेर, ता.शिरपूर) हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांना उपचारार्थ हलवल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा
अपघातात दुचाकीसह ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर अपघाताच्या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला. याप्रकरणी प्रवीण छगन निळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक डी.बी.पवार घटनेचा तपास करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !