जळगावातील माहेर व धुळ्यातील सासर असलेल्या विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
Maher from Jalgaon and a married couple with father-in-law from Dhue took an extreme step जळगाव : अज्ञात कारणातून 40 वर्षीय विवाहितेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. हा प्रकार रविवार, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. योगीता सचिन भावसार (40, वर्शी, ता.जि.धुळे) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
अज्ञात वादातून टोकाचे पाऊल
योगीता भावसार यांचे वर्शी, ता.जि.धुळे येथील सासर असून पती व दोन मुलांसह वास्तव्यास होत्या. गेल्या महिन्याभरापासून त्या प्रकृती खराब असल्याने जळगावतील माहेरी आल्या तर रविवार, 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता त्या निघून गेल्या.त्यांनी आशाबाबा जवळील रेल्वे खांबा नंबर 417/8 जवळ धावत्या रेल्वेसमोर येवून आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून योगीता सचिन भावसार यांची ओळख पटली.





मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. ओळख पटल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात धाव घेवून अक्रोश केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रवीण जगदाळे करीत आहे. मयत महिलेच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत.
