खान्देशी कलाकार बाबूलाल पाटील यांचे निधन


डांभूर्णी, ता.यावल : यावल तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असलेले तसेच अंबाली संस्कृत लघू चित्रपट दिग्दर्शक निर्माता व खान्देशी अहिराणी गीतांचे उत्कृष्ट कलाकार व अध्यात्मिक किर्तनकार हभप बाबूलाल (सर) जगन्नाथ पाटील (35) यांचे मंगळवार, 14 रोजी सकाळी हृदय विकाराने निधन झाले.

हृदयविकाराने झाले निधन
बाबूलाल पाटील यांनी युट्यूब चॅनलवर अनेक गाणी प्रसारीत केली. जवळपास 30 ते 35 गाणी त्यांनी लिहुन युट्यूबकरीता गायली होती. त्यातील हायदमा थाठ मना सालीना, माय मनी तु शिरागडनी, करसु माय मी सासुना आदर, मनुदेवी माय मनी सतनी, ही त्यांची प्रख्यात गाजलेली गाणी सोशल मिडियावर खुप गाजली.आडगाव या लहानशा गावातून जन्मलेल्या बाबूलाल पाटील यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. अध्यात्मिकतेच्या वसेतुन त्यांनी अनेक धार्मिक कार्यक्रमात कीर्तने ही सादर केली तर संस्कृतमधून उच्च शिक्षण घेऊन त्यांनी जळगाव व किनगाव येथील महाविद्यालयात ही विद्यार्थ्यांना संस्कृतमधुन धडे गिरवले. त्यांनी संस्कृतमधून एक अंबाली नावाचा लघू चित्रपट ही काढला होता.खान्देशमधुन एक मोठा कलाकार होण्याचे स्वप्न हे स्वप्नच ठरले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.


कॉपी करू नका.