भुसावळाचे आमदार दमदार : भुसावळ तालुक्यात होणार पर्यटन विकास ; चार कोटी 99 लाखांचा निधी मंजूर

Bhusawal MLA Damdar : Tourism will be developed in Bhusawal taluka ; Fund of 4 crore 99 lakhs approved भुसावळ : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील पाच पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्य शासनाने चार कोटी 99 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी एक कोटी 49 लाख 99 हजार रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून शहरातील तापी काठावरील महादेव घाटाचा विकास व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यामुळे शहरातील तापीकाठ सुशोभित होणार आहे. आमदार संजय सावकारे यांनी या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
आमदारांच्या पाठपुराव्याला यश
प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2023-24 अतंर्गत जळगाव जिल्ह्यातील नवीन कामांना प्रशासकिय मान्यता देवून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात भुसावळ शहरातील जुगादेवी परीसरातील पर्यटन स्थळ विकसीत करण्यासाठी 99 लाख 99 हजार रुपये, साकेगाव, ता.भुसावळ येथे व्याघ्रेश्वर मंदिर वाघूर नदी किनारी पर्यटनस्थळ विकसीत करण्यासाठी 50 लाख, हतनूर धरण परिसर येथे पर्यटन स्थळ विकसीत करण्यासाठी 99 लाख 99 हजार, विल्हाळे, ता.भुसावळ येथे 50 लाख रुपये तर भुसावळ शहरातील तापी नदी परिसरातील महादेव घाट परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी एक कोटी 99 लाख 99 हजार रुपये असा एकूण चार कोटी 99 लाख 99 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी या सर्व कामांसाठी एक कोटी 49 लाख 99 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आता पूढील टप्प्यात निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरवात होणार आहे. यामुळे भुसावळ शहरातील तापीनदी घाट व जुगादेवी परीसरातील सौंदर्यात भर पडेल.
पर्यटनाला संधी मिळेल
नवीन पर्यटन विकासासाठी शासनाकडे निधी मिळावा म्हणून प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार निधीला प्रशासकिय मंजूरी मिळाली आहे. सोबतच सुमारे दीड कोटी रुपये निधी प्राप्तदेखील झाला आहे. शहरातील तापी घाटाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या निधीतून तापी नदीवर जूने महादेव मंदिर परिसरातील सौंदर्यात भर पडेल. यासोबत तालुक्यातील विल्हाळे, हतनूर व साकेगाव येथेही नवीन पर्यटन केंद्र उभे राहतील, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.


