एरंडोल शहरात धाडसी घरफोडी : पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Erandol city : 55 lakhs instead of Lumpas  एरंडोल : घर बंद असल्याची संधी चोरटे साधत असल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. लग्नानिमित्त कुटूंब बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधत पावणेपाच लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना शहरातील कागदीपुर्‍यात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घराला केले टार्गेट
शहरातील कागदीपुरा भागात किराणा व्यावसायीक खालीक अहमद रफिक अहमद (39) हे कुटूंबासह वास्तव्याला आहेत. अमरावती येथे लग्न असल्याने कुटूंब लग्नासाठी गावी गेल्याने 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी संधी साधत घराच्या मागील दरवाजाला होल करीत कडी उघडून घरात प्रवेश केला. दोन लाख 38 हजार 642 रुपये किंमतीचे एकूण 43 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, 10 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे हार, तीन ग्रॅम वजनाच्या सोन्यातील रींगा व अडीच लाखांची रोकड असा एकूण चार लाख 88 हजार 642 रुपये किंमतीचा ऐवज लांबवण्यात आला. पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी भेट देत पाहणी केली.


कॉपी करू नका.