विल पॉवर मजबूत : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ताकदीने लढणार : आमदार एकनाथराव खडसे

आमदार एकनाथराव खडसे : भुसावळ शहरात जंगी स्वागत


Strong will power : NCP will fight in Lok Sabha elections with strength : MLA Eknathrao Khadse भुसावळ : हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानंतर उपचार घेवून परतलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांचे रविवार, 19 रोजी शहरात जल्लोषत स्वागत करण्यात आले. भुसावळ रेल्वे स्थानकावर पहाटे आमदार खडसे आल्यानंतर त्यांचे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार खडसे म्हणाले की, आपली विल पॉवर अत्यंत मजबूत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आपण पुन्हा जोमाने काम करणार आहोत. राष्ट्रवादी पक्षाने धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा जिल्ह्याची जवाबदारी सोपवली असून किमान खान्देशात प्रबळ उमेदवारांच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच यश मिळेल शिवाय रावेरच्या जागेबाबतही आम्ही आग्रही आहोत, असेदेखील त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

भुसावळात जल्लोषात स्वागत
राष्ट्रवादीचे विधान परीषदेचे गटनेते तथा ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांना नुकताच हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले होते. त्यानंतर आमदार खडसे यांचे रविवारी जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी आमदार खडसे यांनी अनेक चर्चांना पूर्णविराम देत आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करणार असल्याचे सूतोवाच केले.

यांची स्वागतप्रसंगी उपस्थिती
भुसावळ रेल्वे स्थानकावर राष्ट्रवादीचे प्रा.सुनील नेवे, विनीता सुनील नेवे, विशाल नारखेडे, सुधाकर जावळे, अमोल इंगळे, हरीश फालक, माजी नगरसेवक गणेश पाटील, रेहान कुरेशी, फैझान खान, गणेश पाटील, किशोर पाटील, भूपेंद्र तायडे, दिनेश भंगाळे, दीपाली बर्‍हाटे, निलेश कोलते, निलेश रायपुरे, संदेश सुरवाडे, पापा मेंबर, प्रा.जतीन मेढे, समीर पिंजारी, गोलु सुरवाडे, नागो पाटील, मुस्ताक शेख, मुस्ताक भाई, धर्मराज तायडे, नंदीनी नेवे, अटल नेवे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.