भाडेतत्वावरील चारचाकीची परस्पर विक्री : नाशिकच्या तिघा ठगांना रावेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या टॉपर विद्यार्थ्याने ऑनलाईन गेममध्ये झालेल्या कर्जाला कंटाळून वापरलेली क्लृप्ती अंगलट


Mutual sale of rented four-wheeler : Three thugs of Nashik were shackled by the Raver police रावेर : भाडेतत्वावरील चारचाकीची रावेरात परस्पर विक्री करीत नंतर ही चारचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रावेर पोलिसांनी नाशिकमधील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. रावेर येथील बर्‍हाणपूर रस्त्यावरील समर्थ मोटर्स गॅरेजचे मालक सतीश बाबूराव बारी यांचा चारचाकी वाहन दुरुस्ती व खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवार, 3 नोव्हेंबरला सतीष बारी यांना त्यांच्या मोबाईलवर शिवकुमार जयराम मुरगन (नाशिक रोड) याने फोन करुन होन्डा कंपनीची जाज चारचाकी वाहन (एम.एच.04 जी.झेड. 1343) विक्री असल्याचे सांगितले. गाडीचा मूळ मालक दवाखान्यात असल्याचे सांगून गाडी मालकाचे बनावट पॅनकार्ड देऊन विश्वास संपादन मुरगनसह तिघांनी बारी यांच्याकडून एक लाख 40 हजार रुपये फोन पे व रोख स्वरुपात स्वीकारत गाडीची विक्री केली.

भाडे तत्वावरील गाडीची परस्पर विक्री
संशयित शिवकुमार जयराम मुरगन (30, खोले माळा, अटलरी चौक, जय भवानी चौक, नाशिक) याने अमित कैलास बुरकुल (31, दीपज्योती रो हाऊस, हिरावाडी, पंचवटी नाशिक) व सुमीत अशोक धाईजे (26, हनुमंतनगर लोखंडे मळा, जेल रोड नाशिक) यांच्याशी संगनमत करीत चारचाकी मूळ मालकाकडून भाडे तत्वावर घेतली व नंतर रावेरातील बारी यांना ही गाडी परस्पर विक्री केली तसेच त्यानंतर संशयित अमित बुरकूल याने पाच-सहा दिवसानंतर नाशिक येथून येऊन बारी यांच्या घरासमोर उभी असलेली गाडी लांबवली. गाडी चोरी गेल्यानंतर सतीश बारी यांनी रावेर पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचे बिंग फुटले.

यांच्या पथकाने केली कारवाई
पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस फौजदार तुषार पाटील, पोलिस कर्मचारी सुनी वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील यांनी नाशिक येथे जावून चोरी झालेल्या वाहनासह वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात केली. तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

ऑनलाईन गेमचे कर्ज फेडण्यासाठी केला उद्योग
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी अमित बुरकूल हा सिव्हिल इंजिनिअरींगचा पदवीधर असून तो नाशिकमधील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा टॉपर विद्यार्थी आहे मात्र तो पैशांच्या हव्यासापोटी मोबाईलवरील ऑनलाईन खेळ खेळत होता. त्यातून त्याच्यावर कर्ज झाले होते. ते फेडण्यासाठी त्याने हा मार्ग पत्करल्याचे समोर आले.


कॉपी करू नका.