दिड हजारांची लाच भोवली : शिरपूरचा पोलिस नाईक धुळे एसीबीच्या जाळ्यात


Bribe of half a thousand : Constable of Shirpur police station Dhule in ACB’s net शिरपूर : दाखल गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी तडजोडीअंती दिड हजारांची लाच मागून ती पोलिस ठाण्याच्या आवारात स्वीकारताना शिरपूर शहर पोलिस ठाण्यातील नाईक लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे यास धुळे एसीबीने अटक केली. हा सापळा बुधवारी दुपारी चार वाजता यशस्वी करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिरपूरचे रहिवासी असून त्यांच्याविरोधात एका प्रकरणात शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक टाळण्यासाठी पोलिस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यांनी मंगळवार, 21 रोजी दिड हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. बुधवारी लाचेची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. पोलिस ठाण्याच्या आवारात लाच स्वीकारताच टाकणे यांना अटक करण्यात आली. शिरपूर शहर पोलिसात टाकणे यांच्याविरोधता गुन्हा दाखल करण्यात आला.






यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !