धुळ्यातील खून झालेल्या तरुणीच्या घराजवळच 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या


A 25-year-old youth committed suicide near the house of the murdered young woman in Dhula धुळे : शहरातील नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटलमागील निकिता कल्याण पाटील या तरुणीची बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करीत हत्या केल्यानंतर तरुणीच्या घरापासून काही अंतरावर एका तरुणाने विष प्राशन करीत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनिकेत वाल्मीक बोरसे (25, मोगलाई, धुळे) असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण व तरुणीचा एकमेकांचा परीचय होता वा नाही याबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

तरुणाच्या आत्महत्येने खळबळ
बुधवारी सायंकाळी निकीता हिचे आई-वडिल व परीवारातील सदस्य बाहेर गेल्यानंतर तरुणी घरी एकटीच असताना अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराचे वार करीत तिची हत्या केली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तरुणीच्या घरापासून काही अंतरावर काटेरी झुडूपात अनिकेत बोरसे या तरुणाचा विष प्राशन केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली. मयत तरुण नाशिकच्या एका केमिकल कंपनीत कामाला असल्याची माहिती आहे. नुकताच हा तरुण धुळ्यात परतल्याचे सांगण्यात ओ.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !