धुळ्यातील शुभम साळुंके खून प्रकरणातील संशयित लाल डोळासह दहा जणांवर ‘मोक्का’

गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : आगामी काळात आणखी काहींवर होणार कठोर कारवाई


Shubham Salunke murder case in Dhule, suspect Lal Dola on ‘mokka’ on ten people धुळे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पोलिस दलावर टिकेची झोड उठली होती तर शहरातील शुभम साळुंके या तरुणाचा खून प्रकरणानंतर पोलिस दलाने कठोर भूमिका घेत या खूनात टोळी समोर आल्यानंतर त्यांच्यावर मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवल्यानंतर या प्रस्तावाला विशेष महानिरीक्षकांकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती धुळ्याचे नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, नवनाथ नगरातील शुभम साळुंके या तरुणाचा 8 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री धारदार शस्त्रासह दगडाने खून झाला होता. या खुनातील कुविख्यात लाल डोळा, जिभ्यासह एक अल्पवयीन अशा सात जणांना अटक करण्यात आली. या घटनेला चिथावणी देणारा विनोद थोरातसह 10 जणांवर गुन्हा दाखल असून संघटीत गुन्हेगारीमुळे सर्व 10 संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सात संशयित अद्यापही कारागृहात
धुळ्यातील महात्मा गांधी चौकात मयत शुभम साळुंके याला 8 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री अडवण्यात आले होते व कोयता, लोखंडी रॉड, फाईटरने मारहाण केल्यानंतर पुन्हा गाडीवर बसवून कोयत्याचा धाक दाखवत वरखेडी रोडवरील डंपिंग ग्राऊंडवर नेण्यात आले होते. जबर मारहाणीत शुभमचा मृत्यू झाल्यानंतर आझादनगर पोलिसात 9 ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला. यात विनोद रमेश थोरात आणि त्याचा सहकारी हर्षल रघुनाथ चौधरी यांनी दोघांनी चिथावणी देत सुपारी देऊन घटना घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांनाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले होते. यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यासह सात जणांना अटक करण्यात आली तर विनोद थोरात, हर्षल चौधरी आणि नाशिक येथील शरद (पूर्ण नाव माहिती नाही) हे अद्यापही पसार आहेत.






दहा जणांवर मोक्काची कारवाई
पोलिसांच्या माहितीनुसार, महेश उर्फ लाल डोळा घनश्याम प्रकाश पवार (32, स्वामी नारायण कॉलनी, धुळे), अक्षय श्रावण साळवे (28, गायकवाड चौक, धुळे), गणेश साहेबराव माळी (20), जगदीश रघुनाथ चौधरी (18, दोन्ही रा.स्वामी नारायण कॉलनी, धुळे), जयेश रवींद्र खरात उर्फ जिभ्या (27, गायकवाड चौक, धुळे), गणेश अनिल पाटील (30) यांच्यासह एक अल्पवयीन अशा सात जणांना अटक करण्यात आली. पसार नाशिक येथील शरद (पूर्ण नाव माहिती नाही), विनोद रमेश थोरात आणि त्याचा सहकारी हर्षल रघुनाथ चौधरी अशा 10 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली. पत्रकार परीषदप्रसंगी धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताजी शिंदे, शिरपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए.एस.आगरकर उपस्थित होते. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !