धुळे शहरात तीन लाखांचे चोरीचे लोखंड जप्त : विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला
Stolen iron worth Rs 3 lakh seized in Dhule city : Police foiled a sale plan धुळे : धुळ्यातील आझादनगर पोलिसांनी चोरीचे लोखंड विक्री करण्यापूर्वीच डाव उधळला असून दोन लाख 80 हजारांचे लोखंड जप्त केले असून ट्रक चालक मात्र पसार झाला आहे. चाळीसगाव रोड भागातील भंगार बाजारात एका गाळ्यासमोर संशयितरीत्या ट्रकमध्ये चोरीचे लोखंड असल्याची गोपनीय माहिती आझादनगरचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले.
संशयित ट्रक चालक पसार
दहा चाकी ट्रक (एम.एच.18 ए.ए.9927) मध्ये लोखंडाची सळई आढळली मात्र हे लोखंड कुठून आणले याचे समाधानकारक उत्तरे मिळाले नाही तर पोलिसांना पाहून ट्रक चालकाने पळ काढल्याने संशय बळावल्यानंतर ट्रक जप्त करण्यात आला.





