साक्री शहरातील ‘तो’ दरोडा बनावट : तरुणीनेच रचला अपहरणाचा बनाव : दोघांना बेड्या
धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची पत्रकार परीषदेत माहिती
‘That’ robbery in Sakri city is fake: The young woman created the fake kidnapping: Both are in chains धुळे : पिस्टल व चाकू लावून दरोडेखोरांनी साक्री शहरात दरोडा टाकत 23 वर्षीय युवतीचे अपहरण केले होते. ही घटना शनिवार, 25 नोव्हेंबरच्या रात्री 10.30 वाजता घडली होती. दरोड्यानंतर युवतीच्या झालेल्या अपहरणाने पोलिस प्रशासनही चक्रावले होते. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मात्र या बनावट दरोड्याची उकल केली असून तरुणीनेच आपल्या मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कारनामा केल्याची माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी बुधवारी पत्रकार परीषदेत दिली. दरम्यान, धुळे गुन्हे शाखेने तरुणीच्या ओळखीतील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विनोद भरत सोनार (नाशिककर)
व रोहित संजय गवळी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
युवतीच्या अपहरणानंतर पोलिसही चक्रावले
साक्री शहरातील विमलबाई महाविद्यालयाच्या पाठीमागे राहणार्या एका कुटूंबाच्या घरावर शनिवारी रात्री 10.30 वाजता तोंडाला मास्क लावून आलेल्या दरोडेखोरांनी कुटूंबातील 40 वर्षीय महिलेला मारहाण करीत व बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोने, चांदीच्या दागिन्यांसह 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटला होता शिवाय घरात मुक्कामासाठी आलेल्या 23 वर्षीय भाचीचे अपहरण करीत चारचाकीतून तिला पळवून नेले होते. दरोड्यानंतर महिलेने आरडाओरड केल्यानंतर रहिवासी जमा झाले व दरोड्याचा प्रकार उघडकीस आला.





तरुणीने दिला कबुली जवाब
तरुणीचा पोलिसांकडून शोध सुरू असताना तरुणीने सेंधवा येथून पालकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर शिरपूर तालुका पोलिसांनी तिला ताब्यात घेत साक्री पोलिसांच्या ताब्यात दिले व त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केल्यानंतर तरुणीने स्वतःच अपहरणाचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले शिवाय दरोडादेखील बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांनी खोटा दरोडा आणि अपहरण केल्याप्रकरणी विनोद भरत सोनार (नाशिककर)
व रोहित संजय गवळी यांना अटक केली आहे.
