दुचाकी चोरट्यांचे त्रिकूट धुळे एलसीबीच्या जाळ्यात : चोरीच्या नऊ दुचाकी जप्त
धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातून दुचाकींची चोरी : घरफोडीचा गुन्हाही उघड
Trio of two-wheeler thieves busted in LCB net: Nine stolen two-wheelers seized धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून धडक कारवाईचा सपाटा कायम असून दुचाकी चोरट्यांच्या त्रिकूटाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकींसह चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी केल्याची कबुलीही दिल्याची माहिती धुळ्याचे नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, चोरट्यांकडून तीन लाख 41 हजारांच्या नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या तर एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील गुरुद्वाराजवळ दुचाकी चोरटा आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. दोन अल्पवयीन मुलांसह फैजान मुजम्मिल अन्सारी (22, रा.कबीरगंज, वडजाई रोड, धुळे) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरूवातीला उडवा-उडवीचे उत्तर दिले मात्र पोलिसी खाक्या दाखवताच चोरीच्या नऊ दुचाकी काढून दिल्या. जप्त दुचाकींमध्ये चार दुचाकी जळगाव जिल्ह्यातील चोरी केलेल्या आहे तर अन्य दुचाकी धुळे जिल्ह्यातून चोरी केलेल्या आहेत.





घरफोडीची कबुली
अटकेतील संशयित फैजान अन्सारी आणि दोन अल्पवयीन अशा तिघांनी मिळून संत नरहरी कॉलनी, अंबिकानगर येथील बंद घरात चोरी केल्याची माहिती देत 6 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या वस्तू आणि पाच हजारांची रोकड काढून दिली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी प्रकाश पाटील, श्याम निकम, संजय पाटील, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, सुरेश भालेराव, रवीकिरण राठोड, सुशील शेंडे, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील, योगेश साळवे, हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली.
