धुळ्यानजीक मारहाण करीत सात लाख लुटले : सात संशयित जाळ्यात
धुळे तालुका पोलिसांची कामगिरी : पिस्टल, दुचाकी व रोकडसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
7 lakh looted by beating near Dhulan: Seven suspects in the net धुळे : दुचाकीवरून जाणार्या दोघांना मारहाण करीत त्यांच्याकडून सात लाखांची रोकड लुटण्यात आली होती. घटना 27 नोव्हेंबर रोजी रोकडोबा हनुमान मंदिराजवळ घडली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख 61 हजारांच्या रोकडसह, पिस्टल, काडतूस, दुचाकी असा एकूण पाच लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमल जप्त केल्याची माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली.
मारहाण करीत लूट
27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजत तक्रारदार हितेश शंकर पाटील व त्यांचा मित्र रोहित निंबा घोरपडे (आवीं) हे दुचाकी (एम.एच.18 सी.बी.3607) वरून धुळ्याकडून आर्वीकडे जात असताना लळींग घाट संपल्यावर रोकडोबा हनुमान मंदीराचच्या आधी उतारावर पल्सर मोटार सायकलींवर चौघांनी दुचाकीला ओव्हरटे करीत दोघांना मारहाण करीत जमिनीवर पाडले व त्यांच्याकडील सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवली. ,





सात आरोपींना बेड्या
धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीअंती दोघांच्या मुसक्या बांधल्यानंतर त्यांनी अन्य पाच साथीदारांची नावे सांगितली. अवघ्या 48 तांसात गुन्हयाचा छडा लावल्यानंतर संशयित उज्जैन फकिरा गायकवाड (20, जुन्नेर, ता.धुळे), दादू विठ्ठल सोनवणे (21, मोरशेवडी, ता.धुळे), राहुल रमेश सूर्यवंशी (26, चितोड), गोकूळ श्रावण अहिरे (28, चितोड, ता.धुळे), बादल राजू मोरे (24, बल्हाणे, ता.धुळे), अनिल हिरामण सोनवणे (26, दिवानमळा, ता.धुळे), प्रकाश खंडू सोनवणे (27, रा.दिवानमळा, ता.धुळे) यांना अटक करण्यात आली. संशयिताना न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गावठी पिस्टलासह दुचाकी जप्त
अटकेतील आरोपींकडून दोन लाख 61 हजारांची रोकड, 25 हजारांचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस, तक्रारदाराचा मोबाईल, तीन दुचाकी तसेच पाच आरोपींचे मोबाईल असा एकूण पाच लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुक्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार नितीन चव्हाण, हवालदार किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, राजू पावरा, कुणाल शिंगाणे, राहुल देवरे आदींनी आरोपींच्या मुसक्या बांधल्या.
