पीक विम्याला दिरंगाई : आमदार चंद्रकांत पाटील यांची मुंबईतील पीक विमा कार्यालयात धडक

पीक विम्याला झालेल्या दिरंगाईचा विचारला जाब : हिवाळी अधिवेशनात मांडणार प्रश्न


Delay in crop insurance : MLA Chandrakant Patil stormed the crop insurance office in Mumbai मुक्ताईनगर : दिवाळीच्या काळात शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम होईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतरही वेळेत पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही.

या अनुषंगाने मुंबईतील अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील मुख्य कार्यालयाला आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मच्छिंद्र सावंत यांच्याशी गतवर्षी जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी हवामानावर आधारीत काढलेल्या पीक विम्याबाबत चर्चा करून मागील वर्षापर्यंत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पीक विम्याची रक्कम जमा झाली परंतु यावर्षी पीक विम्याच्या रकमा वेळेवर जमा न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती आमदारांनी यावेळी देत या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने संबंधितांना जाब विचारला. आतापर्यंत किती शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळाला ? व किती शेतकर्‍यांच्या बँक खात्यात आतापर्यंत पीक विम्याची रक्कम जमा झाली ? तसेच काही शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असतांना त्यांच्या खात्यात रक्कम का जमा झाली नाही? या संदर्भातील माहिती आमदारांनी जाणली.

हिवाळी अधिवेशनात मांडणार प्रश्न :आमदार
किती शेतकर्‍यांची पिक विम्याची प्रकरणे अपात्र केली? व अपात्र का करण्यात आली याची कारणे काय ? याची माहिती त्यांना मागितली. पीक विम्याचा लाभ न मिळालेल्या शेतकर्‍यांना रक्कम किती दिवसात येणार याबाबत विचारणा करून संबंधितांची कान उघाडणी आमदरांनी केली. पीक विम्या संदर्भात येत्या डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगून शेतकर्‍यांची पिळवणूक तत्काळ थांबवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


कॉपी करू नका.