भुसावळातील ग्रामीण भागातील प्रवासी एस.टी.च्या सवलतीपासून वंचित : सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळेंचा आरोप

शिशिर जावळे यांचा आरोप : मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार


भुसावळ : महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांपासून महिला, ज्येष्ठ नागरीकांसाठी विविध सवलती योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत मात्र भुसावळ आगाराकडून भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात दर रविवारी सुटणार्‍या बस फेर्‍या रद्द केल्या जात व भुसावळ ग्रामीण भागातील जनतेला प्रवाशांना प्रवासाच्या सवलतीच्या योजनांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केला आहे.

बसेस अभावी प्रवाशांचे हाल
रविवारी शहराचा आठवडे बाजार भरतो. या दिवशी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, महिला, गोरगरीब जनता आठवडे बाजारासाठी शहरात येतात मात्र याच दिवशी आगाराकडून ग्रामीण भागात बसेस फेर्‍या सोडण्यात येत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रवासी यांना भुसावळ शहरात बाजारासाठी येण्यासाठी विविध साधनांच्या माध्यमातून भाड्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागतो. या आधी आणि ऐन दिवाळीत सुद्धा असाच प्रकार घडला होता व अजूनदेखील सुरू आहे. या प्रकाराची चौकशी करावी तसेच नियमित आठवडाभर ग्रामीण भागात ठरलेल्या नियोजनानुसार बस फेर्‍या सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा शिशिर जावळे यांनी व्यक्त केली आहे. भुसावळ आगाराने मानव कल्याणच्या निळ्या कलरच्या बसेस लाभार्थींसाठी सुरू करण्याची मागणी देखील श्री नमो विचार मंत्र साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्य व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याकडे केली आहे.


कॉपी करू नका.