बॉलीवूड स्टार सुनील शेट्टींच्या हस्ते ‘इंटरनॅशनल बिजनेस स्टार’ अवॉर्ड्सचे दुबईत शानदार वितरण


Distribution of International Business Star Awards in Dubai by Bollywood star Sunil Shetty दुबई : डीके मिशन फोर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नेतृत्वाखाली इंटरनॅशनल बिजनेस ग्रोथ समिटचे आयोजन दुबई शहरातील हॉटेल ग्रॅण्ड एक्सेलसियरमध्ये नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात बालीवूड स्टार सुनील शेट्टी यांच्याहस्ते व्यवसायातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत मान्यवरांना पुरस्काराने गौरवण्यात आले.

भारतातील दोनशे व्यावसायीकांचा सहभाग
दुबई शहरातील हॉटेल ग्रॅण्ड एक्सेलसियरमध्ये डीके मिशन फोर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतातील 200 हून अधिक व्यावसायिक उद्योजक व युएईमधील पाचशेहून अधिक उद्योजकांसह इंटरनॅशनल बिजनेस ग्रोथ समिटद्वारे दोन राष्ट्रांमधील व्यावसायिक दरी कमी करण्यासाठी एक हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मानले जात आहे.

यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते व इंटरनॅशनल बिजनेस स्ट्रॅटेजिस्ट दिलीप औटी, वेल्थ कोच कोमल औटी, सिरीयल उद्योजक चिरंतन जोशी, प्रेरणादायी नेत्रहीन उद्योजक भावेश भाटिया, जीएमबीएफचे अध्यक्ष डॉ.सुनील मांजरेकर यांचा समावेश होता. ‘व्यावसायिक आव्हाने आणि त्यावरचे उपाय’ तसेच विविध विषयावर या बिसनेस समीटमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात नेटवर्किंग, बिजनेस कोलॅबरेशन आणि कल्पनांची देवाण-घेवाण करण्यात आली.

यांचे उपक्रमासाठी सहकार्य
या बिजनेस समिटसाठी डीके मिशन फोर्स (दिलीप औटी-फाउंडर, कोमल औटी -को-फाउंडर) चे कोअर टीम मेंबर नितेश जाधव, विवेक जाधव, राहुल जाधव, सोनाली शेजवळ, सफवान इस्माईल, हिमांशु भिडे सोबतच इन्स्पायर इव्हेंट्स अ‍ॅण्ड प्रमोशन्स, पेमॅक्स, लर्निंग पॉवर, गल्फ महाराष्ट्र बिजनेस फोरम अ‍ॅण्ड टॅक्सेशन सोसायटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


कॉपी करू नका.