यावल शहरात भाजपातर्फे तीन राज्यातील विजयाचा जल्लोष


BJP’s victory in three states in Yaval city यावल : यावल शहरातील भुसावळ टी-पॉईंटवर भाजपाकडून तीन राज्यात मिळालेल्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात विजय संपादीत केला. तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडे सत्ता आल्याने यावल शहरातील भुसावळ टी पॉइंटवर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केली व भारतीय जनता पार्टीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष केला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे, युवा मोर्चाचे बाळू फेगडे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, राहुल बारी, व्यंकटेश बारी, युवा शहराध्यक्ष रीतेश बारी, भूषण फेगडे, स्नेहल फिरके, योगराज बर्‍हाटे, उमेश पाटील, आकाश कोळीसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सावद्यात भाजपाचा विजयानंतर जल्लोष
सावदा : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवत तर मध्यप्रदेशात सत्ता राखली तर राजस्थान व छत्तीसगढमध्ये काँग्रेसला चारी मुंड्या चीत करीत सत्ता काबीज केल्यानंतर अभूतपूर्व यशाचा आनंद सावदा येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटप करून साजरा केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, राष्ट्रीय परीषदेचे डॉ.अतुल सरोदे, शहराध्यक्ष जे.के.भारंबे, माजी शहराध्यक्ष पराग पाटील, संजय चौधरी, नितीन खरे, महेश बेदरकर, पंकज बेदरकर, आकाश भोरटक्के, भारत चव्हाण, राजेश महाजन, जितेंद्र गाजरे, भैया चौधरी, नकुल बेंडाळे, प्रांजल वाघुळदे, निखील येवले, सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.