भारतीय नौदलासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या दोन मोठ्या घोषणा


Prime Minister Narendra Modi made two big announcements for the Indian Navy सिंधुदुर्ग : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सिंधुदुर्ग दौर्‍यावर आल्यानंतर दोन मोठ्या घोषणा केल्यानंतर नौदलातील जवानांचा मोठा उत्साह वाढला आहे. नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा व नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार असल्याची घोषणा यावेळी पीएम मोदींनी यांनी केल्याने जवानांमध्ये उत्साह संचारला. पीएम मोदी म्हणाले, भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं, हे माझं भाग्य असल्याचे पीएम मोदी म्हणाले.

छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण
सिंधुदुर्ग दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तारकर्ली या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या.

छत्रपतींनी शक्तीशाली नौसेना बनवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, समुद्री सामर्थ्य किती महत्वाचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. छत्रपती शिवाजी यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय नौदलाच्या सदस्यांना नौदल दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

 

 


कॉपी करू नका.