जळगावातील भिकमचंद जैन नगरात धाडसी घरफोडी


Daring burglary in Bhikamchand Jain Nagar in Jalgaon जळगाव :l पोलिसांची गस्त भेदून शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम आहे. शहरातील भिकमचंद जैन नगरातील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 97 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. हा प्रकार रविवार, 3 डिसेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता उघडकीस आला. जळगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

चोर्‍या वाढल्या : नागरीक भयभीत
सागर अनिल कुरकुरे (33, रा. भिकमचंद जैन नगर, जळगाव, ह.मु. पुणे, ता.जि.जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत घराचा कडी-कोयंडा तोडून घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 97 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार रविवार, 3 डिसेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता उघडकीला आला. दरम्यान, सागर कुरकुरे यांनी शहर पोलिसात चोरी झाल्याबाबत तक्रार दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे


कॉपी करू नका.