मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीचा लढा आता अंतिम टप्प्यात : भुसावळात मनोज जरांगे पाटील


भुसावळ : मराठा समाजाच्या मुलांसाठी व येणार्‍या पिढीसाठी आरक्षण गरजेचे असून त्यासाठी आता माझा जीव गेला तरी मागे हटणार नाही मात्र त्यासाठी तुमची साथ मोलाची असल्याचे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी दुपारी नाहाटा चौफुलीवर आयोजित छोटेखानी सभेत केले. ते म्हणाले की, आरक्षण मिळण्यासाठीचा लढा आता अंतिम टप्प्यात असून त्यासाठी समाजबांधवांची साथ आवश्यक आहे. यावेळी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत करण्यात आले.

भुजबळांना मी पाहून घेईल
ओबीसी नेत्याच्या भाषणाकडे दुर्लक्ष करा, त्यांच्यासाठी मी खंबीर आहे, त्यांना मी पाहून घेईल, असा सज्ज इशारा त्यांनी छगन भूजबळ यांचे नाव न घेता दिला.

 


कॉपी करू नका.