इंदौरचा गांजा तस्कर शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात : 35 हजारांचा गांजा जप्त


Ganja smuggler of Indore in Shirpur police net : 35 thousand ganja seized शिरपूर : इंदौर शहरातील गांजा तस्कराला शिरपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्याकडून 35 हजारांचा गांजा जप्त केला आहे. फैजानअली आबीद अली (27, रा.आझादनगर, इंदूर, मध्य प्रदेश) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूरच्या खंडेराव मंदिर परिसरातून एक तरुण रात्रीच्या वेळी बॅगमध्ये गांजासदृश पदार्थ घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक ए. एस.आगरकर यांना मिळाली. माहिती मिळताच खंडेराव मंदिर परिसरातील नाना-नानी पार्कजवळ पोलिसांनी सापळा लावला. रविवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास एक तरुण हातात बॅग घेऊन येताना दिसून आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली व बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात 35 हजार 150 रुपयांचा गांजा तसेच 10 हजारांचा मोबाईल आणि 200 रुपये किंमतीची बॅग असा एकूण 45 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर यांच्यासह पथकाने केली.






 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !