जळगावातील शिवपुराण कथेत चोर्‍या : परप्रांतीय गँगची धुळे कारागृहात रवानगी


Thieves in Shivpuran story in Jalgaon : Migrant gang sent to Dhule Jail जळगाव : जळगावात सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेदरम्यान चोर्‍या करणार्‍या तब्बल 37 जणांच्या महिला टोळीला गुन्हे शाखेने अटक केली होती. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयिताना शनिवारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयितांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.

37 जणांची टोळी जाळ्यात
जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिराजवळ श्री शिवमहापुराण कथा सुरु आहे. कथेच्या पहिल्याच दिवशी मंगळवार, 5 डिसेंबर रोजी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली व गर्दीचा फायदा घेत संशयितरित्या फिरणार्‍या 27 महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही ऐवजासह मोबाईल जप्त झाल्यानंतर बुधवारी पुन्हा कथेच्या ठिकाणाहून राजस्थान व मध्यप्रदेशातील 10 जणांची टोळी पकडण्यात आली. संशयितांविरोधात गुन्हा दाखल होवून अटकेतील संशयितांना 9 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली गेली व कोठडी सुनावल्यानंतर तपासाधिकारी किसनराव नजन पाटील यांनी पुन्हा संशयित आरोपींना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सर्वांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !