पाच कोटींच्या निधीतून भुसावळ ग्रामीणमध्ये होणार विकासकामे


रस्ता कामांसह पेव्हर ब्लॉकची कामे होणार असल्याची आमदार संजय सावकारे यांची माहिती

भुसावळ- स्त्यांसह पेव्हर ब्लॉक बसवणे, स्मशानभूमीत रस्ता बनवणे, मोरी बांधणे, सार्वजनिक सभागृह बांधणे आदी कामांसाठी आमदार संजय सावकारे यांनी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. ग्रामीण भागात विकासकामे होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

या कामांना शासनाकडून मंजुरी
कंडारीतील स्मशान भूमी रस्त्याचे डांबरीकरण, कंडारी येथील विष्णू चौधरी यांच्या शेतामधील रस्त्याचे डांबरीकरण, झेडटीआरआयमधील स्मशानभूमी रस्त्याचे डांबरीकरण, झेडटीआरआय रेल्वे ग्राउंड ते डोंगरे यांच्या घराजवळ रस्त्याचे डांबरीकरण, फेकरी येथे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, जाडगावला सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम, मन्यारखेडा येथे सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम, काहुरखेडा येथे सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम, काहुरखेडा ते फॅक्टरी रस्त्याचे डांबरीकरण, खडका येथील उस्मानिया मस्जिद ते कब्रस्तान रस्त्याचे डांबरीकरण, किन्ही-वेल्हाळा रस्त्याचे डब्ल्यूबीएम काम करणे, भुसावळ-खेडी रस्त्याचे डांबरीकरण करणे, साकरी-खडका रस्ता डांबरीकरण करून छोट्या मोरीचे बांधकाम करणे, आचेगाव ते पिंपळगाव खुर्द रस्ता व मोरीचे बांधकाम करणे, सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम करणे, तळवेलला सार्वजनिक सभागृह बांधकाम करणे, खडका येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे, बोहर्डी येथे सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम करणे, बोहर्डी- तळवेल रस्त्याचे डांबरीकरण करणे, वराडसीम येथे सार्वजनिक सभागृह बांधणे, सुनसगाव सार्वजनिक सभागृह बांधकाम करणे तसेच बसस्थानक भागात पेव्हर ब्लॉक बसवणे, किन्हीत सार्वजनिक सभागृह बांधकाम करणे, वेल्हाळे येथे सार्वजनिक सभागृह बांधणे, पिंपळगाव खुर्द ते बेघरवस्ती पूल रुंदीकरण करून रस्ता डांबरीकरण करणे, कठोरा बुद्रुक येथे सार्वजनिक सभागृह बांधकाम करणे तसेच जामनेर रस्ता राज्य महामार्ग ते मांडवेदिगर रस्ता डांबरीकरण करणे या एकूण पाच कोटींच्या कामांचा समावेश आहे.


कॉपी करू नका.