दराणे गावातील डॉ.प्रेमसिंग गिरासेंची हत्या : दोन आरोपींना जन्मठेप
Murder of Dr. Prem Singh Girase of Daranet village : Life imprisonment for two accused धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील डॉ. प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी श्याम युवराज मोरे व संदीप फुलचंद पवार अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना दुहेरी जन्मठेपेची ऐतिहासिक शिक्षा तसेच दहा हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांची सक्त मजुरीचा शिक्षा सुनावण्यात आली.
असे होते खून प्रकरण
दराणेतील डॉ. प्रेमसिंग गिरासे हे शिंदखेडा येथून दुचाकी आपल्या गावी नेत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चिमठाणे ते सोनगीर रस्त्यावरील चिमठाणे सबस्टेशनजवळ त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या आरोपी श्याम मोरे व संदीप पवार (रा.खलाणे) यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थांबले नाहीत म्हणून मांडीवर चाकूने वार केला. यानंतर आरोपींनी दुचाकीने पाठलाग करत रस्ता अडवला. दुचाकीची चावी देत नसल्याने छातीसह विविध ठिकाणी चाकूने गंभीर वार करत ठार करीत दुचाकी घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी जगदीश परमार यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.





टॅटूवरून लागला आरोपीचा शोध
तत्कालीन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांनी दराणे फाट्यानजीकच्या गुरुदत्त पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कंबरेतून चाकू काढून दुचाकीच्या हेडमध्ये ठेवताना संशयिताला हेरले तर संबंधिताचा चेहरा दिसत नसलातरी डाव्या हाताच्या कांबीवरील टॅटूवरून शोधपत्रिका काढली. टॅटूवरून आरोपी खलाणे येथील श्याम असल्याचे निष्पन्न झाले व नंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, या खटल्यातील संशयित राकेश रोहिदास मोरे यास सबळ पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. केले. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील भाबड, कदम, चव्हाण व पठाण आदींचे सहकार्य लाभले.
