धुळ्यात क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा बेटींग : रायगडच्या संशयितासह 12 जणांविरोधात गुन्हा
Online Satta betting on cricket in Dhule : Crime against 12 people including suspect from Raigad धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने भारत विरुध्द दक्षिण अफ्रिका यांच्यात मंगळवारी झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर सट्टा (बेटिंग) लावणार्या रायगड येथील संशयितास अटक करीत सट्टा बेटींग प्रकरणी 12 संशयितांविरुद्ध धुळ्यातील आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील अग्रसेन पुतळ्यासमोरील हॉटेल अमित प्लाझामध्ये नीलेश रामप्रसाद राव (27, कळंबोली, रायगड) हा संशयित भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर भ्रमणध्वनीव्दारे सट्टा लावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला पथकाला मिळाल्यानंतर त्यास बुधवारी ताब्यात घेण्यात आले. राव याने भ्रमणध्वनीतील ऑल पॅनल नावाच्या बेटिंग अॅपव्दारे क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची कबुली दिली. उल्हास नगर येथील अन्य साथीदारांच्या मदतीने हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट होताच रावसह 12 संशयितांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





