भीषण कार अपघातात शिरपूरच्या व्यावसायीकासह हॉटेल चालकाचा मृत्यू


Shirpur businessman along with hotel driver die in horrific car accident शिरपूर : शिरपूर विमानतळानजीक भरधाव कार खड्ड्यात उतरल्याने हॉटेल व्यावसायीक प्रवीण शिवाजी पाटील (42) व बांधकाम व्यावसायीक प्रशांत राजेंद्र भदाणे (35) यांचा मृत्यू ओढवला. हा अपघात नववर्षाच्या मध्यरात्री घडल्याने शिरपूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

नियंत्रण सुटल्यानंतर कोसळली कार
शिरपूर-चोपडा रस्त्यालगत असलेल्या सूतगिरणीच्या मागील बाजूने 31 डिसेंबरला रात्री कारने (एम.एच.18 बी.एक्स.1920) ने प्रवीण शिवाजीराव पाटील (रा.क्रांतीनगर) व प्रशांत राजेंद्र भदाणे (रा.मातोश्री कॉलनी, शिंगावे शिवार) येत सताना कारवरील नियंत्रण सुटल्याने ती मोठ्ठ्या खड्ड्यात जावून उलटली. अपघातानंतर कार रात्रभर पडून होती. प्रवीण पाटील प्रशांत भदाणे दुसरीकडे प्रवीण पाटील व प्रशांत भदाणे घरी न आल्याने दोघांच्या कुटुंबीयातर्फे त्यांना मोबाईलवर संपर्क साधला जात होता. पण संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दोघांचा अपघात झाल्याचे पहाटे उघडकीस आले. दोघांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी दोघांना मृत घोषित करण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !