धुळे जिल्हा परीषदेच्या अध्यक्षपदी धरती देवरे बिनविरोध
धुळे : जिल्हा परीषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या सदस्या धरती देवरे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी धरती देवरे यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षपदी देवरे यांची निवडणूक अधिकार्यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.
धरती देवरे या जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांच्या सुनबाई आहेत तर गुजरातच्या नवसारी मतदार संघातील खासदार सी.आर.पाटील यांच्या सुकन्या आहेत. खासदार सी.आर.पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात.





