योजनेचे बिल काढण्यासाठी ‘लाचेची शाळा’ ; अक्कलकोसच्या मुख्याध्यापिकेला एका दिवसाची पोलिस कोठडी


‘Bribery school’ to get the bill of the scheme; Akkalkos headmistress remanded to one-day police custody… धुळे : गटविमा योजनेचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप (39, रा.अभिनव रो हाऊस क्रमांक 10, गुलमोहर हाईट्सच्या मागे, मखमलाबाद रोड नाशिक)
यांना धुळे एसीबीने मंगळवारी दुपारी अटक केली होती. त्यांना बुधवारी धुळे सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
59 वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचे गट विमा योजनेचे एक लाख 33 हजारांचे देयक हे प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांनी मंजूर केले होते. या देयकाचे आहरण व संवितरण करण्याचे काम मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांच्याकडे होते. त्यामुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी जगताप यांच्याकडे थकीत एकाकरीता पाठपुरावा केला असता जगताप यांनी पाच हजार रुपये लाच मागितली व चार हजारात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. मंगळवारी दुपारी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.






मुख्याध्यापिकेला एका दिवसाची कोठडी
दरम्यान, लाचखोर मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप (39) यांना धुळे न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !