धुळे जिल्ह्यात सात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांना पोलिसांनी दिले कारवाईचे इंजेक्शन

वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना थाटले दवाखाने : औषधी साठा जप्त


In Dhule district, seven ‘Munnabhai’ doctors were given an injection by the police
धुळे  :
वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना दवाखाना थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या धुळे जिल्ह्यात सात डॉक्टरांवर पोलिसांनी छापेमारी करीत गुन्हे दाखल केल्याने बोगस डॉक्टरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुन्नाभाई डॉक्टरांच्या दवाखान्यातून मोठ्या प्रमाणावर अ‍ॅलॉपॅथीचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांमध्ये पिंपळनेरच्या चार तर शिरपूर शहरासह तालुक्यात दोन व सोनगीरच्या एका डॉक्टरांचा समावेश आहे. धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिसांनी कारवाई करीत तोतया डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !