राहुल नार्वेकरांच्या आजारावर खासदार संजय राऊतांचे मोठे विधान : म्हणाले ‘हा’ देखील मोठा राजकीय भूकंपच


MP Sanjay Rauta’s big statement on Rahul Narvekar’s illness: He said ‘this’ is also a big political earthquake धुळे : राज्यातील अपात्रता प्रकरणात 10 रोजी निकाल येण्याची शक्यता असतानाच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आजारी पडले आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी हादेखील एक राजकीय भूकंपच असल्याचे म्हणत भूकंपाला सुरूवात झाली असल्याचे म्हटले आहे.

शिंदेंना मिळालेला निधी आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठी
एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारीवर बोलताना राऊत म्हणाले की, माझ्या प्रतिउत्तराला उत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत, ते मुख्यमंत्री जरूर आहेत. यांना जो निधी मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. धुळे दौर्‍यावर असताना राऊत पत्रकारांशी आज बोलत होते.






तर तुमचाही घोटाळा उघड करू
राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करू नये, नाहीतर तुमचा निधी घोटाळा आम्हाला उघडा करावा लागेल. मुंबई महानगरपालिकेची 90 हजार कोटींची तिजोरी कोणी लुटली ? असा देखील प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला. राज्यातील 14 महानगरपालिका निवडणुका तुम्ही पराभवाच्या भीतीने घेत नाहीत, असे म्हणत संजय राऊत यांनी तुमच्याकडे चिन्ह असलेली शिवसेना आहे तर मग निवडणुका का घेत नाहीत, असा प्रश्न भाजप समोर उपस्थित केला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !