मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले ; अबकी बार 45 पार ; राजकारणात लवकरच मोठा भूकंप
The Chief Minister clearly said ; Abaki bar 45 par ; Big earthquake in politics soon नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकच्या दौर्यावर आहेत. त्यांच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर मोठा भूकंप येार आहे. राज्यातही अब की बार 45 पार, असेल असे ते म्हाले. पंतप्रधान मोदींना एवढे प्रेम देशात मिळते तेवढे प्रेम देशात कुणालाच मिळत नसेल. विरोधकांना हे खटकते व त्यांच्या पोटात दुखते. आता अहंकारी लोकांचा अहंकार संपणार आहे.
आजच दिवस स्वप्नपूर्तीचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचा गौरवमूर्ती असा उल्लेख करत, आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असल्याचे म्हटले आहे. अटल सेतूमुळे 20 मिनिटात प्रवास होणार, असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. हा मार्ग विकासाचा मार्ग आहे, यामुळे वेळ आणि इंधन वाणार आहे. या देशात मोदी गॅरंटी चालते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.









