धुळ्यात खाजगी वाहनातून गुटख्याची वाहतूक : निफाड तालुक्यातील दोघे जाळ्यात

धुळे गुन्हे शाखेची कामगिरी : 44 हजारांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त


Transport of Gutkha by private vehicle in Dhule : Two from Niphad taluka in the net धुळे :खाजगी वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने धुळे टोल नाक्याजवळील हॉटेल सिटी पॉईंटसमोर वाहन अडवून त्यातून 44 हजारांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री उशिरा करण्यात आली. याप्रकरणी रऊफ युसूफ अत्तार (51, सरकारनगर, मुसलमान गल्ली, पिंपळगाव बसवंत, ता.निफाड) व मुश्ताक मुक्तार शेख (56, सरकारनगर, मुसलमान गल्ली, पिंपळगाव बसवंत, ता.निफाड) यांच्याविरोधात मोहाडी उपनगर पोलिसात गुनहा दाखल करण्यात असून त्यांना अटक करण्यात आली.

गोपनीय माहिवीवरून कारवाई
चारचाकी क्रमांक एम.एच.43 बी.के.5993 ही सेंधव्याकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येत असताना पथकाने टोल नाक्याजवळ तिला अडवत तिची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले. पाच लाख रुपये किंमतीचे वाहन व 44 हजार 126 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, प्रकाश पाटील, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, मयूर पाटील, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !