विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात


Thackeray group in Supreme Court against the decision of Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar मुंबई : राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील शिवसेना सत्तासंघर्ष याचिकांप्रकरणी अलीकडेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवत शिंदे गट हीच शिवसेना असल्याचा निकाल दिला होता शिवाय उद्धव ठाकरे गटातील सर्व आमदारांनाही पात्र ठरवले होते. या निकालाविरोधात ठाकरे गटाने आता सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

नार्वेकरांचा निकाल पक्षपाती
नार्वेकरांनी पक्षपातीपणे निकाल दिला असून त्यांनी दिल्लीतील स्क्रिफ्ट वाचली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला तर नार्वेकरांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही ते म्हणाले होते तर या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.



जनतेच्या न्यायालयात काय बोलणार ठाकरे ?
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवार्रें 16 जानेवारी रोजी महापत्रकार परीषदेचे आयोजन केले आहे. ‘सत्य ऐकून विचार करा !’ असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येतंय. ही पत्रकार परिषद नेमकी आयोजित करण्याची वेळ का आली आहे? या पत्रकार परिषद असे कोणते मोठे गौप्यस्फोट जाणार? पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सोबत नेमकं कोण असणार? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !