जामनेरच्या तरुणाचा खून : मारेकरी शोधण्याचे आव्हान


जामनेर : भुसावळ रस्त्यावरील औद्योगिक वसाहत परीसरात संजय चव्हाण (25, बजरंगपुरा, जामनेर) या तरुणाचा दगड, विटांनी ठेचुन खून झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली होती. या तरुणाचा खून कुणी व का केली? याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, उपनिरीक्षक विकास पाटील हे सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. यावेळी तरुणाच्या मृतदेहाजवळ चष्म्याचे फुटलेले काच दिसले. याचबरोबर मोबाइल तसेच सीम कार्ड व बॅटरी विखरलेले दिसुन आले. ही खुनाची घटना पाच ते साडेपाचच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी पाच वाजेच्या सुमारास चारचाकी क्रुझर वाहन थांबल्याचे काहींनी पाहिल्याचे समजते. घटनास्थळी पोलिसांकडुन रात्री साडेआठ वाजेपर्यंत पाहणी सुरू होती. घटनेची माहिती समजताच नागरीकांनी मोठी गर्दी केली.


कॉपी करू नका.