धक्कादायक ! : विद्यार्थ्यांची बोट उलटली : दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू


Shocking! : Students’ boat capsizes : 12 students die including two teachers वडोदरा : क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बोटीमध्ये बसवण्याचा प्रकार जीवघेणा ठरला असून या घटनेत दोन शिक्षकांसह दहा ते बारा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल आहे. ही धक्कादायक घटना गुजरातच्या वडोदरा येथे गुरुवारी घडली. हर्णी तलाव पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची बोट उलटली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 15 जणांची क्षमता असलेल्या बोटीवर न्यू सनराइज स्कूलचे 25-27 विद्यार्थी बसवण्यात आले व एकाकडेही लाईफ जॅकेट नव्हते.

दोषींवर कारवाई होणार
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे वडोदराचे जिल्हाधिकारी ए.बी.गोरे यांनी सांगितले आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असे वडोदरा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ.शीतल मिस्त्री यांनी सांगितले. या घटनेवर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. प्राण गमावलेल्या निष्पाप मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल म्हणाले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !