अयोध्येत घातपाताच्या तयारीने आलेल्या त्रिकूटाला युपी एटीएसकडून अटक


UP ATS arrests the trio who came to Ayodhya to prepare for the attack नवी दिल्ली : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे देशभराचे लक्ष लागून लागले असताना दुसरीकडे युपी एटीएसने घातपाताच्या उद्देशाने आलेल्या तिघांना अटक केली आहे. संशयित हे खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित असून राजस्थानचे रहिवासी आहेत. शंकरलाल, अजित कुमार आणि प्रदीप कुमार अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. तिघांनीही आपल्या गाडीवर श्रीरामांचा झेंडा लावून अयोध्येची रेकी केल्याचे समोर आले असून आरोपींची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे.

हरमिंदरच्या सांगण्यावरून तिघांची रेकी
शंकरलाल हा कॅनडामधील खलिस्तान समर्थक हरमिंदर ऊर्फ लांडा याच्या संपर्कात होता. हरमिंदर याने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतने अयोध्येची रेकी करण्यास सांगितले आहेत असे शंकरला सांगितले होते. तसेच अयोध्येचा नकाशा पाठवण्याचीही सूचना दिली होती. कॅनडामध्ये असलेल्या हरमिंदर उर्फ लांडा याच्या सांगण्यावरूनच हे तिघेही अयोध्येत पोहोचले होते.



मिळत असलेल्या माहितीनुसार शंकरलाल राजस्थानमधील कुख्यात गँगस्टर आहे तसेच त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो कॅनडामध्ये असलेल्या गँगस्टरच्या संपर्कात होता, तो खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित आहे. पोलिस आणि सुरक्षा यांत्रणांना चकवा देण्यासाठी आरोपी श्रीरामांचा ध्वज लावून अयोध्येत पोहोचले होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !