बिल्कीस बानो प्रकरणात 11 आरोपींचे आत्मसमर्पण


11 accused surrender in Bilkis Bano case नवी दिल्ली : गोध्रा तुरुंग अधिकार्‍यांसमोर बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींनी रविवारी रात्री उशिरा आत्मसमर्पण केले. 2002 च्या गुजरात दंगलीतील बिल्किस सामूहिक बलात्काराच्या दोषींना मुदतपूर्व सुटका देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 8 जानेवारी रोजी रद्द केला होता. न्यायालयाने सर्व दोषींना दोन आठवड्यांच्या आत म्हणजेच 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते.

आरोपी तुरूंगात
11 दोषी दोन वाहनांतून दाहोद जिल्ह्यातील सिंगवाड येथून गोध्रा उप कारागृहात पोहोचले. दोषींमध्ये राधेश्याम शाह, जसवंत नई, गोविंद नई, केसर वोहनिया, बाका वोहनिया, राजू सोनी, रमेश चंदना, शैलेश भट्ट, बिपिन जोशी, प्रदीप मोढिया आणि मितेश भट्ट यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींचा माग काढण्यात आला. आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.



न्यायालयाने दिले होते आदेश
8 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारचा निर्णय रद्द केला होता
2002 च्या गुजरात दंगलीतील बिल्किस सामूहिक बलात्काराच्या दोषींना मुदतपूर्व सुटका देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 8 जानेवारी रोजी रद्द केला होता. न्यायालयाने सर्व दोषींना दोन आठवड्यांच्या आत म्हणजेच 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते.

2008 मध्ये 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती
2004 मध्ये सामूहिक बलात्काराच्या आरोपींना अटक करण्यात आली होती. जानेवारी 2008 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा कायम ठेवली होती. आरोपींना प्रथम मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आणि नंतर नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. तब्बल 9 वर्षानंतर सर्वांना गोध्रा सबजेलमध्ये पाठवण्यात आले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !