परवानगी मिळो अथवा न मिळो उपोषण करणारच : मनोज जरांगे-पाटलांचा निर्धार


Will go on hunger strike whether permission is given or not: Manoj Jarange-Patal’s determination मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंचा ताफा पुण्यात पोहोचला असून बुधवारी ते पिंपरी चिंचवडमध्ये मुक्कामी असतील. तत्पूर्वी सरकारकडून विविध अधिकारी पाठवून त्यांची समजूत घातली जात आहे. सरकारकडून मुंबईतील उपोषणाला परवानगी मिळो अथवा न मिळो उपोषण करणारच असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रांजणगावहून निघून नगररोडने कोरेगाव भिमामार्गे खराडीत मुक्काम केला. तेथून ही पदयात्रा खराडी बायपास- पुणे स्टेशन- औंध गाव- रक्षक सोसायटी – काळेवाडी फाटा – डांगे चौक – चिंचवड स्टेशन – आकुर्डी – निगडी देहूरोड -(जुना एक्सप्रेस वे ने)- लोणावळा मुक्कामी जाणार आहे. जरांगेंच्या या रॅलीला मराठा समाजाचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रॅलीतील सहभागी मराठ्यांच्या राहण्यासाठी, जेवणासाठी व इतर गोष्टींसाठी नियोजन केलं जात आहे. जरांगे पाटील आज पुण्यात आले असून बुधवारी पुण्यातून मुंबईकडे निघणार आहेत. तत्पूर्वी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात वाहतून वळवली
पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने मंगळवार, 23 रोजी दुपारी तीन वाजेपासून आवश्यकतेनुसार अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरातील मुंबई पुणे महामार्गावरील कोल्हापूर सातारा येथून येणारी अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशीन चौक मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला नावे शिरूर मार्गे वळविण्यात आली आहे. त्यानंतर वाघोली लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा सोलापूर रोड येथून वाहतूक केडगाव चौफुला नावरा मार्गे ते शिरूर आशी वळवण्यात येणार आहे.

 


कॉपी करू नका.