धुळ्यात 54 हजारांचा गुंगीकारक औषध साठा जप्त : सुरतसह धुळ्यातील संशयिताला अटक
54,000 intoxicating drug stock seized in Dhulai : Suspect arrested from Surat and Dhule धुळे : धुळ्यात गुंगीकारक औषध साठा विक्रीपूर्वीच गुन्हे शाखेने सुरतच्या विक्रेत्यासह धुळ्यातील खरेदीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वेस्थानक परीसरात बुधवारी दुपारी बारा वाजता एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांना अटक करत 53 हजार 550 रुपये किंमतीच्या 357 बाटल्या आणि 60 हजार रुपये किंमतीची रीक्षा असा एक लाख 13 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील स्टेशन रोडसमोरील ऋतुराज हॉटेलच्या बाजूने कॉलनीत जाणार्या रस्त्यावर रीक्षा (एम.एच.18 ए.जे.6027) या क्रमांकाच्या ऑटो ररक्षातून कोरेक्स या गुंगीकारक औषधाच्या बाटल्या नेल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाल्यानंतर पथकाला त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पथकाने विक्रेता मोहम्मद अहमद शाह (38, रा.मिठीखाडी, सुरत) व खरेदीदार शोएब खान अजीज शाह पिंजारी (34, रा.गजानन कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) यांना अटक केली.





यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रताप पाटील, संतोष हिरे, शाम निकम, संदीप पाटील, संजय पाटील, गुणवंत पाटील, सुनील शेंडे, नीलेश पोतदार, रवीकिरण राठोड, मुकेश वाघ, हर्षल चौधरी, सुरेश भालेराव व रवींद्र माळी आदींच्या पथकाने केली.
