धुळ्यातील देवपूरात घरफोडी : कुविख्यात आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Burglary in Devpur in Dhule : Notorious accused in crime branch’s net धुळे  : शहरातील देवपूर पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी करणार्‍या आरोपीच्या धुळे गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. धनंजय अरुण वाकळे (22, वीटभट्टी महानगरपालिका हॉस्पीटलजवळ, देवपूर, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून दहा हजारांची रोकडसह 35 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील देवपूर पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी (गुरनं.34/2023, भादंवि 454, 457, 380) ही धनंतय वाकळे याने दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती गुन्हे शाखा निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. संशयिताला ताब्यात घेताच त्याने घरफोडीची कबुली देत दहा हजारांची रोकड, दोन सोन्याची अंगठी, पितळी समई, दिवा, खलबत्ता, डबे असा एकूण 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह पथकातील बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, शाम निकम, संजय पाटील, संतोष हिरे, चेतन बोरसे, मुकेश वाघ, पंकज खैरमोडे, प्रकाश सोनार, शशिकांत देवरे, हर्षल चौधरी, जितेंद्र वाघ, महेंद्र सपकाळ, चालक राजू गीते आदींनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !