आगामी 25 वर्ष देश व तरुणांसाठी महत्त्वाची : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजयुमो पदाधिकार्‍यांना नमो नवमतदाता संमेलनात ऑनलाईन मार्गदर्शन


Next 25 years important for country and youth: PM Narendra Modi भुसावळ : भारताच्या लोकशाही प्रक्रियेला बळकट करणे ही भारतातील तरुणांची जबाबदारी आहे. 18 ते 25 वयोगटातील वय तरुणांच्या जीवनाला आकार देते कारण ते त्यांच्या जीवनात गतिमान बदल पाहत असतात. या बदलांसोबतच ते विविध जबाबदार्‍यांचाही एक भाग बनतात. देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करीत असून आगामी 25 वर्ष देशासह तरुणांसाठी महत्त्वाचे असल्याचे विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. गुरुवारी भाजपा युवा मोर्चातर्फे आयोजित नमो नवमतदाता संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. भुसावळसह फैजपूर येथे भाजयुमो पदाधिकार्‍यांनी प्रक्षेपणाचा लाभ घेतला.

भुसावळात आमदारांसह पदाधिकारी उपस्थित
शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात पंतप्रधानांच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. आमदार संजय सावकारे, भाजपा व्यापारी महाराष्ट्र प्रकोष्ठचे मनोज बियाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष मोंटू अग्रवाल, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष युवराज लोणारी, भाजयुमो शहराध्यक्ष गौरव आवटे, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, महेंद्रसिंग ठाकूर, प्रमोद नेमाडे, पुरूषोत्तम नारखेडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, बापू महाजन, देवा वाणी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, शहर उपाध्यक्ष चेतन बोरोले, राहुल तायडे, अनुसूचित जाती मोर्चाचे साजीद शेख, गौरव लोणारी, विशाल नाटकर, वैभव लोणारी, भाजयुमो सरचिटणीस अथर्व पांडे, लाजरस मणी, तुषार महाजन, उपाध्यक्ष चेतन सावकारे, लखन रणधीर, प्रथमेश कोठारी, रोशन राणे, सचिन बर्‍हाटै, चिटणीस हिमांशू दुसाणे, देवेश कुळकर्णी, सचिव देवेंद्र फालक, दर्शन चिंचोले, सचिव व प्रसिद्धी प्रमुख प्रशांत भट, खजिनदार मनीष सारंगधर पाटील, प्रभाग क्र. 6 चे युवा अध्यक्ष हरमित सिंग माखन, प्रभाग क्र. 7 चे युवा अध्यक्ष अमोल झटकार, ओबीसी सेलचे अध्यक्ष भावेश चौधरी, भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचे सागर जाधव व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



कुर्‍हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर
नमो नवमतदार संमेलनाचा लाईव्ह कार्यक्रम कुर्‍हा येथील स्व.अशोक फडके महाविद्यालयात झाला. यावेळी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक कांडेलकर, पुरणमल चौधरी, शिवलकर, प्रभाकर सुशीर, प्रल्हाद बढे, डी.एस.चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, सरचिटणीस विनोद पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य राजू सवळे, तालुका चिटणीस रवी राजपूत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल झाल्टे, कुर्‍हा शहराध्यक्ष प्रवीण शिंपी, रामचंद्र झाल्टे, दिगंबर विटे, मुख्याध्यापक चौधरी तसेच विद्यार्थी, शिक्षक वृंद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !