धुळ्यातील कुविख्यात दुचाकी चोरटे जाळ्यात : चोरीच्या दहा दुचाकी जप्त
धुळे स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
Notorious two-wheeler thieves in Dhula caught : Ten stolen two-wheelers seized
धुळे : धुळे गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांच्या त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून तब्बल चार लाख 30 हजार रुपये किंमतीच्या दहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत तर त्यातील तीन दुचाकींबाबत धुळे शहर व चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हे दाखल आहेत. कफिल अहमद शकील अहमद अन्सारी (20, मौलवीगंज, कलंदरचौक, एकलबाल रोड, धुळे), तौसीफ शेख गुलाम मोहम्मद (32, तिरंगा चौक, अन्सार नगर, धुळे) व अनिस फारकेट अकबर मन्यार (दिलदार नगर, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व सहकार्यांनी केली.





