गुजरातच्या ड्रग्ज तस्कराला यावल शहरात एनसीबीकडून बेड्या
Drug smuggler of Gujarat arrested by NCB in Yaval city यावल : यावल- भुसावळ रस्त्यावर घोडे पीर बाबाच्या दर्ग्याजवळ रविवारी सायंकाळी गुजरात राज्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) ड्रग्स तस्कर तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या. मोबीन शाह असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मोबीन शाह हा तरुण दर्ग्याजवळ कारने आला तर त्याच्यासोबत तीन साथीदार होते मात्र ते पसार झाले. पथकाने मोबीन शाहकडून पिस्टल काही साहित्य जप्त केले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल-भुसावळ रस्त्यावरील घोडे पीर बाबा दर्ग्याजवळ कार क्रमांक (जी. जे.05 आर. एम.8480) द्वारे गुजरात राज्यातील सुरत येथील मोबीन शाह हा ड्रग्ज तस्कर आला असता तो मित्रांसोबत दर्ग्याजवळ बसला असताना त्याच्या मागावर गुजरात राज्याचे अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) हे होते. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हे पथक येथे दाखल झाले व पथकाला पाहून मोबीन शाह हा पसार होत असताना पोलिसांनी त्याच्यावर पिस्टल रोखले व सिनेस्टाइल त्यास ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान त्याच्याबरोबर असलेले तीन साथीदार मात्र शेत-शिवारात पसार झाले. मोबीन शहा याच्याकडून पोलिसांच्या पथकाने एक पिस्टलासह काही वस्तू हस्तगत केल्या


यावल पोलिसांची धाव
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार भूषण चव्हाण, मुस्तफा तडवी हे दाखल झाले. गुजरातच्या पथकाने सांगीतले की, संशयित शाह ड्रग्ज तस्कर असून तो पसार असल्याने त्याचा शोध घेत असताना तो यावलमध्ये आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. संशयिताला गुजरात राज्यातील सुरत येथील दिंडोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही दिंडोली पोलीस ठाण्याचे कुलदीपसिंग हमुभाई दया, दिवेश हरिभाई चौधरी सह इतर अधिकारी व कर्मचारी कर्मचार्यांनी केली.







